लंडन - अमेरिकेची १७ वर्षीय युवा टेनिसपटू कोको गॉफ हिने काजा जुवानचा ६-३, ६-३ अशा फरकाने पराभव करत चौथी फेरी गाठली. गॉफ २०१९ मध्ये चौथी फेरी गाठण्यात अपयशी ठरली होती. तिचा पुढील सामना सोमवारी विम्बल्डन चॅम्पियन अँजेलिक कर्बर हिच्याशी होणार आहे. दुसरीकडे पुरूष एकेरीत स्वित्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडररने कॅमेरून नोर्रीचा तर जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेवने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जचा पराभव करत चौथी फेरी गाठली.
पुरुष एकेरीत तिसऱ्या फेरीत फेडररने कॅमेरुनविरुद्धचा सामना ६-४, ६-४, ५-७, ६-४ अशा फरकाने जिंकला. तर अलेक्झांडर झ्वेरेवची गाठ टेलरशी झाली. तेव्हा हा सामना झ्वेरेवने ७-६ (७-३), ६-४, ६-३, ७-६ (७-४) अशा फरकाने जिंकला. सातव्या मानांकित इटलीच्या मॅटिओ बेरेटिनी याने स्लोव्हाकियाच्या एलजाज बेडेने याचा ६-४, ६-४, ६-४ अशा फरकाने पराभव करत पुढील फेरी गाठली.
महिला एकेरीत इम्मा राडूकानू विम्बल्डनची चौथी फेरी गाठणारी इंग्लंडची पहिली युवा खेळाडू ठरली. १८ वर्षीय राडूकानू आपला पहिलाच ग्रँडस्लॅम खेळत आहे. तिने तिसऱ्या फेरीत रोमानियाची अनुभवीटेनिसपूटसोराना क्रिस्टीचा ६-३, ७-५ ने पराभव केला.