महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विम्बल्डन स्पर्धाः फेडरर विरुध्द नदाल - उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी फेडरर म्हणतो... - Rafael nadal

मागील काही वर्षांपासून नदालने ग्रास कोर्टवर चांगला खेळ करत आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा केली आहे. तसेच आमच्या दोघात खूप दिवसांनी सामना होत आहे. नदालने आपल्या सर्विस करण्याच्या पध्दतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. यामुळे तो लवकर गुण मिळवत असल्याचे फेडरर म्हणाला.

विम्बल्डन स्पर्धाः फेडरर विरुध्द नदाल - उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी फेडरर म्हणतो...

By

Published : Jul 11, 2019, 9:12 PM IST

लंडन - विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष गटातील उपांत्य फेरीचा सामना स्वित्झर्लंडचा अव्वल खेळाडू रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल यांच्यात होणार आहे. हे दोन्ही खेळाडू २००८ साली विम्बल्डनमध्ये समोरासमोर आले होते. तसेच हे दोघे याच वर्षीच्या फ्रेंच ओपनमध्ये भिडले होते. या सामन्यात स्पेनच्या नदालने बाजी मारली होती.

टेनिस इतिहासात रॉजर फेडररने २० ग्रॅन्डस्लॅम जिंकली आहेत. तर नदालने १८ ग्रॅन्डस्लॅम ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. विम्बल्डनच्या इतिहासात फेडररने तब्बल ८ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तर नदालला फक्त दोन वेळा स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले आहे. असे असताना, फेडररने नदाल ग्रास कोर्टवर चांगला खेळ करत असल्याचे म्हटले आहे.

मागील काही वर्षांपासून नदालने ग्रास कोर्टवर चांगला खेळ करत आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा केली आहे. तसेच आमच्या दोघात खूप दिवसांनी सामना होत आहे. नदालने आपल्या सर्विस करण्याच्या पध्दतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. यामुळे तो लवकर गुण मिळवत असल्याचे फेडरर म्हणाला.

फेडरर-नदाल कट्टर प्रतिस्पर्धी -
फेडरर आणि नदाल हे टेनिसमधील कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. या दोघांमधील शेवटचा सामना रोमहर्षक झाला होता. त्यामध्ये नदालने ६-४, ६-४, ६-७(५-७), ६-७(८-१०), (९-७) ने विजय मिळवला होता. तर २००६ आणि २००७ साली अंतिम सामन्यात फेडररने नदालचा पराभव केला होता.

विम्बल्डन स्पर्धेमध्ये बुधवारी फेडररने उपांत्यपूर्व सामन्यात जापानच्या केकेई निशिकोरीचा ४-६, ६-१, ६-४, ६-४ असा पराभव केला. या विजयासह फेडररने विम्बल्डन स्पर्धेत विजयाचे शतकही पूर्ण केले. तर नदालने अमेरिकेच्या सॅम क्वेरीचा ७-५, ६-२, ६-२ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

ABOUT THE AUTHOR

...view details