लंडन- विम्बल्डन स्पर्धेमध्ये भारताचा लिएंडर पेस आणि त्याचा फ्रान्सचा जोडीदार बेनोएट पेयरे यांना पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. पाच सेटमध्ये रंगलेल्या या सामन्यात कझाकिस्तानचा एलेक्झेंडर बुबलिक आणि मिखाईल कुकुशाकिन या जोडीने ४-६ ६-७, ६-३, ७-६, ९-७ असा पेसच्या जोडीचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात भारताचा टेनिस खेळाडू पूरव राजा आणि जीवन नेदुनचेझियन या जोडीचाही पराभव झाला. तर भारताचा दिविज शरण आपल्या जोडीदारासह दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे.
भारतीय खेळाडूंचे आज तीन सामने झाले. या तीन सामन्यात भारताच्या दोन खेळाडूंचा पराभव होऊन ते स्पर्धेबाहेर पडले आहेत. त्यामध्ये लिएंडर पेस आणि पूरव राजा याचा समावेश आहे. तर दिविज शरण दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे.