महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विम्बल्डन स्पर्धा : नोव्हान जोकोव्हिचचा पहिल्या फेरीत सहज विजय - विम्बल्डन स्पर्धा 2019

जागतिक क्रमवारीमध्ये अग्रस्थानी असलेला सर्बियाचा खेळाडू नोव्हान जोकोव्हिचने विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सहज विजय मिळवला. त्याने जर्मनीच्या फिलिप कोलश्रायबर याचा ६-३, ७-५, ६-३ असा एकतर्फी पराभव केला.

विम्बल्डन स्पर्धा : नोव्हान जोकोव्हिचा पहिल्या फेरीत सहज विजय

By

Published : Jul 1, 2019, 11:32 PM IST

लंडन - जागतिक क्रमवारीमध्ये अग्रस्थानी असलेला सर्बियाचा खेळाडू नोव्हान जोकोव्हिचने विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सहज विजय मिळवला. त्याने जर्मनीच्या फिलिप कोलश्रायबर याचा ६-३, ७-५, ६-३ असा एकतर्फी पराभव केला.

इंडियन वेल्स स्पर्धेमध्ये फिलिप कोलश्रायबर याने नोव्हान जोकोव्हिचचा पराभव केला होता. त्यामुळे या स्पर्धेत रंगतदार सामना होईल, अशी टेनिसप्रेमीची अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा चार वेळा चॅम्पियन असलेल्या जोकोव्हिचने सामन्यात आक्रमक खेळ फोल ठरवली. जोकोव्हिचने दोन तास ३ मिनिटात हा सामना जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.

विम्बल्डनच्या दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाच्या लिओनाडरे मायेर याने एर्नेस्ट गुलबिसचा ६-१, ७-६, ६-२ असा पराभव केला.

ABOUT THE AUTHOR

...view details