न्यूयॉर्क - यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच याचा पराभव झाला. रशियाच्या डेनिल मेदवेदेव याने त्याचा 6-4, 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केले. या पराभवासह जोकोविचचे कॅलेंडर स्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले. जोकोविच सामन्यात अनेकवेळा चिडलेला पाहायला मिळाला.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला डेनिल मेदवेदेव याने सुरूवातीपासून सामन्यावर पकड निर्माण केली होती. यामुळे नोवाक जोकोविच अंडर प्रेशरमध्ये खेळताना दिसला. मेदवेदेव याने आघाडी घेतली तेव्हा जोकोविच फ्रस्ट्रेट झाला. या फ्रस्ट्रेशनमध्ये त्याने आपले रॅकेट तीन वेळा कोर्टवर ताकतीने मारले. त्याने रॅकेट इतक्या जोराने कोर्टवर मारला की रॅकेट पूर्णपणे तुटले.
नोवाक जोकोविचने कधी तोडला रॅकेट?
सामना सुरू होऊन जवळपास दीड झाला होता. यात डेनिल मेदवेदेवची आघाडी कायम होती. नोवाक जोकोविच सतत मेदवेदेवची आघाडीची आघाडी भेदण्याच्या प्रयत्न करत होता. पण त्याचे मनसुबे मेदवेदेव हाणून पाडले. तेव्हा फ्रस्ट्रेट होऊन जोकोविचने रॅकेट कोर्टवर मारत तोडला. यानंतर त्याला वॉर्निंग देण्यात आली.