महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

यंदा प्रेक्षकांशिवाय रंगणार यूएस ओपन स्पर्धा - latest update of us open

कोरोनामुळे खबरदारी म्हणून क्रीडाउपक्रम प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येत आहेत. ''यूएस टेनिस असोसिएशन (यूएसटीए) खेळाडूंच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलेल'', असे क्योमो यांनी मंगळवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

us open tennis tournament 2020 to be held in an empty stadium
यंदा प्रेक्षकांशिवाय रंगणार यूएस ओपन स्पर्धा

By

Published : Jun 17, 2020, 3:36 PM IST

वॉशिंग्टन - टेनिसविश्वातील महत्त्वाची मानली जाणारी यूएस ओपन स्पर्धा यंदा प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्योमो यांनी ही माहिती दिली. ही स्पर्धा 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येईल.

कोरोनामुळे खबरदारी म्हणून क्रीडाउपक्रम प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येत आहेत. ''यूएस टेनिस असोसिएशन (यूएसटीए) खेळाडूंच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलेल'', असे क्योमो यांनी मंगळवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

''यूएस ओपन क्विन्स येथे 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाईल. यूएसटीए खेळाडू व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी खबरदारीच्या उपाययोजना करेल'', असेही ते म्हणाले. यूएसीटीएकडून याबाबत अधिकृत निवेदन नंतर देण्यात येईल.

दरम्यान, यूएसटीएचे मुख्य कार्यकारी आणि कार्यकारी संचालक माईक डॉवसे म्हणाले, "न्यूयॉर्कचे राज्यपाल क्योमो यांनी ही मंजूरी दिल्याबद्दल आम्ही उत्साही आहोत. यूएस ओपन आणि 2020 वेस्टर्न अँड साउदर्न ओपन यूएसटीए बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटरमध्ये आयोजित केली जाईल.''

ABOUT THE AUTHOR

...view details