न्यूयॉर्क - पाचव्या मानांकित जर्मन खेळाडू अलेंक्झांडर ज्वेरेवने यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष गटात अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. ज्वेरेवने क्रोएशियाच्या २७व्या मानांकित बोर्ना कोरीचविरुद्धचा सामना १-६, ७-६(५), ७-६(१), ६-३ असा जिंकला.
यूएस ओपन : अलेंक्झांडर ज्वेरेव, नाओमी ओसाका उपांत्य फेरीत
अलेंक्झांडर ज्वेरेवने यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष गटात अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. तर, महिलांच्या गटात जपानची स्टार टेनिसपटू नाओमी ओसाका आणि अमेरिकेची जेनिफर ब्रॅडी एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश नोंदवला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीस ज्वेरेवने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, पुढच्याच सामन्यात त्याला डॉमिनिक थीमने हरवले होते. रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच, राफेल नदाल बाहेर पडल्यामुळे या स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे.
तर, महिलांच्या गटात जपानची स्टार टेनिसपटू नाओमी ओसाका आणि अमेरिकेची जेनिफर ब्रॅडी एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश नोंदवला आहे. जपानच्या ओसाकाने तिच्या दमदार खेळाच्या जोरावर अमेरिकेची ९३वी मानांकित शेल्बी रॉजर्सचा ६-३, ६-४ असा पराभव केला. तर, अमेरिकेच्या २८व्या मानांकित ब्रॅडीने २३व्या मानांकित कझाकिस्तानच्या युलिया पुतिनसेवाचा ६-६, ६-२ असा पराभव केला.