न्यूयॉर्क - दोन वेळा ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केव्हिन अँडरसनने शनिवारपासून सुरू होणाऱ्या यूएस ओपन स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. केव्हिन अँडरसनच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याने हा निर्णय घेतल्याची, माहिती यूएस टेनिस संघटनेने दिली आहे. अँडरसनच्या ठिकाणी इटलीचा खेळाडू पाओला लोरेंजी याला खेळवण्यात येणार असल्याचेही संघटनेने जाहीर केले आहे.
यूएस ओपन २०१९ : दोन वेळा ग्रॅण्डस्लॅमची अंतिम फेरी गाठणारा केव्हिन अँडरसनची स्पर्धेतून माघार
दोन वेळा ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केव्हिन अँडरसनने शनिवारपासून सुरू होणाऱ्या यूएस ओपन स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. केव्हिन अँडरसनच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याने हा निर्णय घेतल्याची, माहिती यूएस टेनिस संघटनेने दिली आहे.
यूएस ओपन २०१९: दोन वेळा ग्रॅण्डस्लॅमची अंतिम फेरी गाठणारा केव्हिन अँडरसनची स्पर्धेतून माघार
दक्षिण आफ्रिकेचा ३३ वर्षीय खेळाडू केव्हिन अँडरसन हा २०१७ मध्ये फ्लशिंग मिडोज पार्कच्या मैदानात राफेल नदाल विरुध्द पराभूत झाला होता. तर मागील २०१८ मध्ये तो विम्बल्डनमध्ये नोवाक जोकोव्हीचविरोधात पराभूत झाला होता.
यंदाच्या यूएस ओपन स्पर्धेत नोवाक जोकोव्हीच, राफेल नदाल आणि रॉजर फेडरर हे सहभागी झाले असून यांचे पारडे जड आहे.