न्यूयॉर्क - भारतीय खेळाडू सुमित नागल याने दिग्गज खेळाडू रॉजर फेडररला वरिष्ठ स्थरावरील ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात चांगलेच झुंजवले. पहिला सेट ६-४ असा सुमितने जिंकला. त्यानंतर फेडररने अनुभवाच्या जोरावर हा सामना ४-६, ६-१, ६-२, ६-४ असा जिंकला. या सामन्यानंतर आणखी एका भारतीय खेळाडूला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये पराभूत व्हावे लागले. भारतीय खेळाडू प्रज्ञेश गुणेश्वरन याला स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला.
Us Open 2019 : सुमित नागल पाठोपाठ भारतीय प्रज्ञेश गुणेश्वरन स्पर्धेबाहेर, मेदवेदेव्हने केला पराभव - प्रज्ञेश गुणेश्वरन
प्रज्ञेश गुणेश्वरन आणि रशियाचा खेळाडू डेनिल मेदवेदेव्ह या दोघांमध्ये झालेल्या सामन्यात मेदवेदेव्ह याने बाजी मारली. त्याने हा सामना ६-४, ६-१, ६-२ असा जिंकला. या पराभवाबरोबरच प्रज्ञेश गुणेश्वरन याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

पहिला सेट वगळता प्रज्ञेश गुणेश्वरन याला मेदवेदेव्ह याने सामन्यात परतण्याची संधी दिली नाही. सामन्यानंतर बोलताना मेदवेदेव्ह म्हणाला, पहिल्या सेटमध्ये प्रज्ञेश गुणेश्वरन याने मला चांगली लढत दिली. सामना माझ्यासाठी कठीण होता मात्र, मी पहिला सेट ६-४ ने जिंकल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि सामना जिंकण्यात यशस्वी ठरलो. स्पर्धेमध्ये हीच लय कायम ठेवण्यासाठी मी प्रयत्नशी राहिन. अशी प्रतिक्रिया मेदवेदेव्हने दिली.