न्यूयॉर्क - कॅनडाची १९ वर्षीय महिला टेनिसपटू बियांका आंद्रेस्कू हिने यूएस ओपन २०१९ ची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून इतिहास रचला. अशी कामगिरी करणारी ती पहिलाच कॅनेडिअन खेळाडू ठरली. बियांकाने अंतिम सामन्यात २३ ग्रँडस्लॅम विजेती सेरेना विल्यम्स हिचा ६-३, ७-५ असा पराभव केला. या विजयाबरोबर बियांका सर्वात कमी वयात ग्रँडस्लॅम जिंकणारी दुसरी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी २००६ मध्ये रशियाची मारिया शारापोव्हा हिने ग्रँडस्लॅम जिंकले होते.
यूएस ओपनसाठी बियांका २ वेळा ठरली अपात्र -
यंदाच्या यूएस ओपन विजेती ठरलेली बियांका मागील दोन वर्ष यूएस ओपन स्पर्धेसाठी पात्र ठरलेली नव्हती. ती पात्रता फेरीतील पहिल्या राऊंडमधून बाहेर पडली होती.
पहिल्या जेतेपदावेळी 'तिचा' जन्मही झाला नव्हता, तिनं आज सेरेनाला चारली धूळ!