न्यूयॉर्क -सर्बियाचा टेनिसस्टार नोव्हाक जोकोविचने शनिवारी मिलोस राओनिकचा पराभव करून वेस्टर्न आणि सदर्न टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. जोकोविचने राओनिकचा १-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. यापूर्वी जोकोविचने २०१८मध्ये प्रथमच ही स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी जोकोविचने अंतिम सामन्यात रॉजर फेडररचा पराभव केला होता.
जोकोविचने राओनिकविरूद्ध विजयी विक्रम कायम ठेवला. या दोघांमधील सर्व ११ सामन्यांत जोकोविचने बाजी मारली आहे. यावर्षी त्याने सर्व २३ सामने जिंकले आहेत. जोकोविचने जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानी असलेल्या राफेल नदालच्या एटीपी मास्टर्स-१००० स्पर्धेच्या विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी केली. जोकोविच आणि नदालच्या खात्यात या प्रकारात प्रत्येकी ३५ जेतेपदे आहेत. एटीपी मास्टर्स-१००० स्पर्धेची सर्व विजेतेपदे जिंकणारा जोकोविच हा एकमेव खेळाडू आहे.