नवी दिल्ली -भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने शनिवारी इझहानसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा तहकूब करण्यात आल्यामुळे सानिया आपल्या मुलासह घरी वेळ घालवत आहे.
टेनिसस्टार सानियाने मुलासह शेअर केला फोटो - sania mirza latest news
सानियाने मिर्झाने शनिवारी इझहानसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. "आम्ही अशाप्रकारे झोपेतून उठतो. दुसरा कोणताही मार्ग नाही", असे तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. सानियाने काही वर्ष टेनिसमधून ब्रेक घेतला होता. यावर्षी तिने पुनरागमन केले.
टेनिसस्टार सानियाने मुलासह शेअर केला फोटो
सानियाने ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला. "आम्ही अशाप्रकारे झोपेतून उठतो. दुसरा कोणताही मार्ग नाही", असे तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. सानियाने काही वर्ष टेनिसमधून ब्रेक घेतला होता. यावर्षी तिने पुनरागमन केले.
पुनरागमनानंतर हॉबार्ट स्पर्धेच्या महिला दुहेरीचे तिने विजेतेपद पटकावले आहे. या व्यतिरिक्त, तिने फेड कपमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. तथापि, कोरोना व्हायरसमुळे टेनिसचे वेळापत्रक ठप्प झाले आहे.