महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टेनिसच्या महानायकाला भारताची भूरळ, म्हणतो..

संबंधित एका कंपनीने फेडररसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने भारताबद्दल आणि तिथल्या चाहत्यांबद्दल मत मांडले. फेडरर म्हणाला, 'मला भारत देश खुप आवडतो. मी तिथे प्रवास करण्यासाठी उत्सुक आहे. हा देश खुप उत्साहाने भरलेल्या लोकांचा देश आहे.'

टेनिसच्या महानायकाला भारताची भूरळ, म्हणतो..

By

Published : Sep 4, 2019, 12:09 PM IST

Updated : Sep 4, 2019, 3:17 PM IST

नवी दिल्ली -स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने भारतीय चाहत्यांविषयी मत मांडले आहे. भारतीय लोकांमध्ये खुप उत्साह आणि तेवढीच उर्जाही असते, असे फेडररने एका कंपनीसोबतच्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा -फिरकीपटू अश्विन पत्नीला म्हणतो, 'हे सर्व थांबव, मला सहन होत नाही.'

संबंधित एका कंपनीने फेडररसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने भारताबद्दल आणि तिथल्या चाहत्यांबद्दल मत मांडले. फेडरर म्हणाला, 'मला भारत देश खुप आवडतो. मी तिथे प्रवास करण्यासाठी उत्सुक आहे. हा देश खुप उत्साहाने भरलेल्या लोकांचा आहे.'

फेडररने २००६, २०१४ आणि २०१५ मध्ये भारताचा दौरा केला होता. सध्या सुरु असलेल्या यूएस ओपन स्पर्धेतून फेडरर बाहेर पडला आहे. बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हने पाच सेटच्या थरारक सामन्यात फेडररचा पराभव केला. तिसऱ्या मानांकित फेडररला दिमित्रोव्हने ६-३, ४-६, ६-३, ४-६, २-६ असे हरवले. या सामन्यात ३८ वर्षीय फेडररचे पारडे जड मानले जात होते. मात्र, दिमित्रोव्हने सुरेख खेळ करत फेडररवर कुरघोडी केली.

जोकोविचच्या दुखापतीमुळे फेडररला होती विजयाची संधी -

जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचने या स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे सर्वांच्या नजरा फेडररवर लागल्या होत्या. मात्र, त्याआधीच तो स्पर्धेबाहेर पडला आहे.

Last Updated : Sep 4, 2019, 3:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details