नवी दिल्ली -यूएस ओपन स्पर्धेमध्ये रॉजर फेडररला झुंजवणाऱ्या सुमित नागलने ब्यूनस आयर्स एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. आपल्या कारकिर्दीमध्ये सुमित तिसऱ्यांदा एखाद्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे.
हेही वाचा -राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : हरियाणाच्या नैना आणि पूजाला सुवर्णपदक
उपांत्य फेरीत सातव्या सीडेड सुमितने चौथ्या सीडेड ब्राझीलच्या थियागो मोंटियोला ६-०, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत सुमितने स्थानिक खेळाडू अर्जेंटिनाच्या फ्रांन्सिस्कोला ६-३, ४-६,६-४ असे नमवले होते.
मागच्या महिन्यात सुमितने खेळलेल्या त्याच्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत टेनिसचा सम्राट रॉजर फेडररला झुंजवले होते. त्याने फेडररला पहिल्या सेटमध्ये मात दिली होती. अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत १५९ व्या स्थानी असलेल्या सुमितचा सामना अर्जेंटिनाच्या एफ बॅगनिसशी होणार आहे.
नुकत्याच झालेल्या बांजा लूका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा टेनिसपटू सुमित नागलचा पराभव झाला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणाऱया सुमितने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान गाठले होते. एटीपीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत सुमितने १५९ वे स्थान गाठले. २२ वर्षीय सुमितला बांजा लूका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेदरलँडच्या टालोंन ग्रीकस्पूरने हरवले. या सामन्यावेळी सुमित १७४ व्या स्थानावर होता. टालोंनने सुमितचा २-६, ३-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करत जेतेपद पटकावले होते.