नवी दिल्ली -भारताचा अनुभवी आणि दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आगामी वर्षात निवृत्ती घेणार आहे. पेसने जागतिक टेनिसमध्ये भारताला मोठे यश मिळवून दिले. यंदाच्या वर्षात पेस दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्यांदा अव्वल-१०० खेळांडूंमधून बाहेर पडला होता. १९ वर्षानंतर पेसची क्रमवारीत अशी घसरण झाली आहे.
भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस नवीन वर्षात घेणार निवृत्ती - लिएंडर पेस टेनिस न्यूज
यापूर्वी २००० मध्ये पेस अव्वल-१०० खेळांडूंमधून बाहेर पडला होता. तेव्हा तो ११८ व्या स्थानावर होता. पेस ऑगस्ट २०१४ मध्ये अव्वल-१० मधून बाहेर पडला होता. पेसने आतापर्यंत १८ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.

यंदा पेस आणि न्यूझीलंडच्या मार्कस डॅनियल या जोडीने हॉल ऑफ फेम टेनिस ओपनच्या उपांत्य सामन्यात धडक मारली होती. 46 वर्षीय पेस 2006 नंतर एटीपीच्या उपांत्य सामन्यात पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता. त्याने अमेरिकेचे दिग्गज खेळाडू जॉन मॅक्नेरो यांना मागे टाकले. 18 ग्रँडस्लम जिंकणारा पेस हा दुहेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्यांमध्ये सहावा खेळाडू ठरला आहे.