पॅरिस - फ्रेंच ओपन स्पर्धेत रॉजर फेडररने रविवारी पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटिनाच्या लिओनार्डो मेयरला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉजरने लिओनार्डोला ६-२, ६-३, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे.
फ्रेंच ओपन : फेडररची विजयी घौडदौड कायम, लिओनार्डोला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये केला प्रवेश
क्वार्टर फायनलमध्ये फेडररचा सामना आपलाच देशवासी स्टॅन वावरिंकाशी होणार आहे
फेडररने दुसऱ्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेत मेयरला पराभूत केले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये अमेरिकन ओपनच्या पहिल्या फेरीत फेडररने मेयरवर मात केली होती. क्वार्टर फायनलमध्ये फेडररचा सामना आपलाच देशवासी स्टॅन वावरिंकाशी होणार आहे.
37 वर्षीय रॉजर फेडररने आपला मागचा फ्रेंच ओपनचा किताब २००९ मध्ये जिंकला होता. क्वार्टर फायनलमध्ये फेडररने विजय मिळवल्यास सेमीफायनलमध्ये त्याचा सामना ११ वेळा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालशी होणार आहे. नदालने युआन इगनेसियो लोंडेरोचा ६-२, ६-३, ६-३ असा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय.