मेलबर्न -भारतचा युवा टेनिसपटू सुमित नागलला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत अव्वल दहा खेळाडूंपैकी एकाविरुद्ध सामना करावा लागण्याची अपेक्षा होती. पण, शुक्रवारी झालेल्या ड्रॉनुसार सुमितला लिथुआनियाच्या रिकॉर्ड्स बेरेनकीसविरुद्ध खेळावे लागेल.
जागितक क्रमवारीत ७२व्या क्रमांकावर असलेल्या बेरेनकीसविरुद्ध सुमितचा हा दुसर्या आठवड्यात दुसरा सामना असेल. याआधी सुमितला बेरेनकीसने मात दिली होती. सध्या सुमितची जागतिक क्रमवारी १३९ अशी आहे.