नवी दिल्ली - कोरोनाकाळात खेळवण्यात येणाऱ्या यूएस ओपनमध्ये भारताची धमाकेदार सुरूवात झाली आहे. भारताचा आघाडीचा युवा टेनिसपटू सुमित नागलने अमेरिकेच्या ब्रेडली क्लानला धूळ चारत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. गेल्या सात वर्षात यूएस ओपनच्या पुरूष एकेरीत विजय नोंदवणारा सुमित नागल हा पहिला भारतीय ठरला आहे.
गेल्या सात वर्षात 'जे' कोणालाही जमले नाही 'ते' सुमितने करून दाखवले
सुमितने अमेरिकेच्या ब्रेडली क्लानला 6-1, 6–3, 3-6, 6-1 असे हरवले. सुमित ही स्पर्धा दुसऱ्यांदा खेळत आहे. सुमितचा पुढील सामना ऑस्ट्रियाचा दिग्गज डॉमिनिक थीमबरोबर रंगणार आहे.
सुमितने क्लानला 6-1, 6–3, 3-6, 6-1 असे हरवले. सुमित ही स्पर्धा दुसऱ्यांदा खेळत आहे. सुमितचा पुढील सामना ऑस्ट्रियाचा दिग्गज डॉमिनिक थीमबरोबर रंगणार आहे.
गतविजेता राफेल नदाल आणि 20 ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर यांच्यासह अनेक दिग्गज टेनिसपटूंनी कोरोनामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे सुमितला यूएस ओपनमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. सुमित नागलने मागील वेळी यूएस ओपनसाठी पात्रता मिळवली होती. त्यानंतर त्याचा पहिला सामना रॉजर फेडररशी रंगला होता. सुमितने फेडररविरूद्ध एक सेटही जिंकला होता. या सामन्यानंतर सुमित लोकांच्या नजरेत आला.