शांघाय -सहाव्या सीडेड ग्रीसचा उदयोन्मुख खेळाडू स्टेफानोस सितसिपासने जागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या नोवाक जोकोविचला पराभूत केले. सध्या सुरू असलेल्या शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत जोकोविचला उपांत्यपूर्व फेरीत गारद व्हावे लागले आहे.
हेही वाचा -'हॉट' हंसिकासोबत झळकणार श्रीशांत, हॉररपटात साकारणार भूमिका
अंत्यंत अटीतटीच्या लढतीत २१ वर्षीय सितसिपासने जोकोविचला ३-६, ७-५, ६-३ असे हरवत उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला. या विजयासोबत त्याने पुढच्या महिन्यात लंडनमध्ये होणाऱ्या एटीपी फायनल्समध्ये आपली जागा निश्चित केली. दिग्गज जोकोविचला हरवल्यामुळे सितसिपासने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 'त्याचा खेळ उच्च दर्जाचा आहे. सर्व्हिसनंतर, त्याचा खेळ उंचावतो. तो या विजयास पात्र होता', असे जोकोविचने सामन्यानंतर म्हटले आहे.
उपांत्यफेरीत त्याचा सामना रूसच्या डॅनियल मेदवेदेवशी होईल. मेदवेदेवने इटलीच्या फाबियो फोगनिनिला ६-३, ७-६ (४) अशी मात देत अंतिम ४ मध्ये स्थान पक्के केले आहे.