रोम - स्वीत्झर्लंडचा स्टार आणि तीन वेळचा ग्रँडस्लॅम विजेता स्टॅन वावरिंका इटालियन ओपनच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडला आहे. १८ वर्षीय लोरेन्झो मुसेटी याने वावरिंकाला ६-०, ७-६ (२) असे हरवत दुसरी फेरी गाठली. मुसेटीने एक तास २४ मिनिटांत हा सामना आपल्या नावावर केला.
१८ वर्षांच्या टेनिसपटूकडून वावरिंकाचा पराभव - स्टॅन वावरिंका लेटेस्ट न्यूज
इटलीचा १८ वर्षीय लोरेन्झो मुसेटी याने स्टॅन वावरिंका याला इटालियन ओपनच्या पहिल्या फेरीतून बाहेर ढकलले. इटालियन ओपनच्या दुसर्या फेरीत मुसेटीचा सामना जपानच्या केई निशिकोरीशी होईल.
![१८ वर्षांच्या टेनिसपटूकडून वावरिंकाचा पराभव Slug stan wawrinka out in first round of italian open](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8822242-thumbnail-3x2-fff.jpg)
पहिल्या सेटमध्ये अनुभवी वावरिंकाने बर्याच चुका केल्या. त्याला एकही गेम जिंकता आला नाही. दुसर्या सेटमध्ये त्याने पुनरागमनाचा प्रयत्न केला, पण मुसेट्टीने गुण जिंकत सामना खिशात टाकला. विजयानंतर मुसेटी म्हणाला, "पहिला सेट खूपच चांगला होता. वावरिंका पेचात सापडला होता आणि सामना जिंकण्याची त्यांची इच्छा होती. त्याने चांगली कामगिरी केली. मला असे वाटते की सामन्यात आघाडी घेणे महत्त्वाचे होते."
२०१८ यूएस ओपन ज्युनियर स्पर्धेत मुसेटी उपविजेता ठरला होता. तर, त्याने २०१९मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन ज्युनियर स्पर्धा जिंकली होती. इटालियन ओपनच्या दुसर्या फेरीत मुसेटीचा सामना जपानच्या केई निशिकोरीशी होईल.