नवी दिल्ली - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या रोमानियाची महिला टेनिसपटू सिमोना हालेपने पुढच्या महिन्यात होणार्या पालेर्मो लेडीज ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. यजमान इटलीने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रोमानिया आणि बल्गेरियातून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन राहणे अनिवार्य आहे, असा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर हालेपने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे .
सिमोना हालेपची पालेर्मो लेडीज ओपन स्पर्धेतून माघार - सिमोना हालेप लेटेस्ट न्यूज
स्पर्धेचे आयोजक ओलिव्हिएरो पाल्मा म्हणाले, ''31 व्या पालेर्मो लेडीज ओपनमधील हालेपचा सहभाग रद्द करण्याचा निर्णय आम्ही कठोरपणे घेतला आहे. आम्ही सिमोनाच्या कर्मचार्यांना सांगितले होते, की व्यावसायिक खेळाडूंवर क्वारंटाईनचे बंधन नसेल.''
स्पर्धेचे आयोजक ओलिव्हिएरो पाल्मा म्हणाले, ''31 व्या पालेर्मो लेडीज ओपनमधील हालेपचा सहभाग रद्द करण्याचा निर्णय आम्ही कठोरपणे घेतला आहे. आम्ही हालेपच्या कर्मचार्यांना सांगितले होते, की व्यावसायिक खेळाडूंवर क्वारंटाईनचे बंधन नसेल. तरीही हालेपच्या कर्मचार्यांनी आमचे सर्व प्रयत्न फोल ठरवत ती या स्पर्धेत खेळणार नसल्याचे सांगितले. हालेपच्या या निर्णयाने आम्ही अत्यंत निराश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
3 ऑगस्टपासून पालेर्मो लेडीज ओपन सुरू होईल, जी 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. कोरोना व्हायरसमुळे सुमारे 5 महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रथमच डब्ल्यूटीएची व्यावसायिक टेनिस स्पर्धा खेळण्यात येणार आहे.