रोम -अव्वल मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपने तिचे पहिले इटालियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. महिला गटात झालेल्या अंतिम सामन्यात तिने झेक प्रजासत्ताकच्या गतविजेत्या कॅरोलिना प्लिस्कोवा विरुद्ध विजय साकारला.
हालेपने प्लिस्कोवा विरुद्ध ६-०, २-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र, प्लिस्कोवाला सामन्यादरम्यान दुखापत झाली. या दुखापतीमुळे तिने मैदान सोडले. यानंतर हालेपला विजयी घोषित करण्यात आले. २०१७ आणि २०१८मध्ये हालेप या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाली होती. मात्र, यावर्षी तिने जोरदार लढत देत विजेतेपद पटकावले.