स्पेन (माद्रीद) -रोमानियाची महिला टेनिस खेळाडू सिमोना हालेपने माद्रीद ओपन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. हालेपने गुरुवारी मानोलो सांटाना कोर्टवर महिला एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अशली बार्टीला ७-५, ७-५ ने सरळ सेटमध्ये नमवत सेमीफायनल गाठली.
माद्रीद ओपन : सिमोना हालेप सेमीफायनध्ये दाखल तर नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का - Naomi Osaka
माद्रीद ओपनमध्ये मोठा उलटफेर, महिला क्रमवारीतअव्वल असलेल्या नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का
सिमोना हालेप आणि नाओमी ओसाका
जागतिक महिला क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या हालेपचा सेमीफायनध्ये सामना स्वित्झर्लंडच्या बेलिंदा बेनकिक हिच्यासोबत होणार आहे. बेलिंदाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाला ६-३, ६-२,७-५ ने पराभवाचा मोठा धक्का देत सेमीफायनल गाठली. या पराभवामुळे नाओमीचे माद्रीद ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे.