लंडन- विम्बल्डन स्पर्धेच्या महिला गटातील अंतिम सामन्यात सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का बसला आहे. रोमानियाच्या सिमोना हालेपने सेरेनाचा ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये एकतर्फी पराभव केला.
अंतिम सामन्यात हालेपने सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला. तिने पहिल्या सेटमध्ये ४-० एकतर्फी आघाडी घेतली. तेव्हा सेरेनाने सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र हालेपच्या आक्रमणासमोर सेरेनाचा निभाव लागला नाही. तिने पहिला सेट ६-२ असा फरकाने गमावला.