रोम -अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सने दुखापतीमुळे इटालियन ओपनमधून माघार घेतली आहे. शनिवारी स्पर्धेच्या आयोजकांनी ही माहिती दिली. या दुखापतीमुळे सेरेनाला यूएस ओपनच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्रास झाला. या सामन्यात तिला अझारेंकाकडून पराभव स्वीकारावा लागला.
इटालियन ओपनमधून सेरेनाची माघार, तर नदाल घेणार सहभाग - italian open latest news
सेरेनासोबत जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेली बियांका आंद्रेस्क्यूनेही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर, पुरूष वर्गात राफेल नदाल या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
''अकिलीज दुखापतीमुळे सेरेना विल्यम्सने आपले नाव इटालियन ओपनमधून मागे घेतले आहे. ही स्पर्धा सोमवारपासून प्रेक्षकांशिवाय फोरो इटालिको येथे खेळली जाईल", असे इटालियन ओपनने सांगितले. सेरेना म्हणाली, ''अकिलीज दुखापतीमुळे मी निराशाजनक पद्धतीने माझे नाव मागे घेत आहे. रोममधील माझ्या चाहत्यांच्या पाठिंब्याने मी भारावून गेली असून मी लवकरात लवकर परत येण्याचा प्रयत्न करेन.''
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेली बियांका आंद्रेस्क्यूनेही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर, पुरूष वर्गात डॉमिनिक थीम आणि अलेक्झांडर ज्वेरेवने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. फेब्रुवारीनंतर तो प्रथमच कोर्टात दिसेल.