रोम -अमेरिकेची दिग्गज महिला टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्स इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतून बाहेर पडली आहे. २३ वेळा ग्रँड स्लॅम विजेता असेलेली सेरेना दुखापतग्रस्त झाल्याने ती आता या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. याच स्पर्धेत माजी अग्रमानांकित असलेली डेन्मार्कची टेनिसपटू कॅरोलिन वोझ्नियाकीनेही दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
सेरेना विल्यम्स इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतून बाहेर - withdraw
माजी अग्रमानांकित असलेली कॅरोलिन वोझ्नियाकीनेही दुखापतीमुळे माघार घेतली आहे
सेरेना विल्यम्सला या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत आपली मोठी बहीण व्हीनस विल्यम्सच्या आव्हानाला सामोरे जाणार होती. स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णयावर बोलताना सेरेना म्हणाला की, 'मी आगामी फ्रेंच ओपन स्पर्धेत आपल्या सर्वांना भेटेन आणि चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल सर्वाचे मनपूर्वक आभार.'
रशियाच्या मारिया शारापोव्हानेही खांद्याच्या दुखापतीमुळे इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. या स्पर्धेच्या आयोजकांकडून व्हीनस विल्यम्स आणि व्हिक्टोरिया अजारेंका यांना वाईल्ड कार्ड देण्यात आले आहे.