नवी दिल्ली - महिलांच्या एकेरीमध्ये खेळताना अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहेत. तिने पेत्रा मर्तिचला ६-३, ६-४ असे हरवले.
हेही वाचा - टेनिस : एकेरी आणि दुहेरीत भारताच्या मुकुंदने पटकावले उपविजेतेपद

३७ वर्षीय सेरेनाने दुसऱ्या सेटदरम्यान मेडिकल ब्रेक घेतला होता. तिला पायाला दुखापत झाली होती. सेरेनाने २२ व्या सीडेड पेत्राला हरवत आपल्या कारकिर्दीतला ९९ वा विजय साजरा केला. शिवाय, तिने १६ वेळा स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. सेरेनाने सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे. २०१७ नंतर तिने कोणतेही विजेतेपद पटकावलेले नाही. सेरेनाचा पुढचा सामना चीनच्या वांग कियांगशी होणार आहे.
दुखापतीमुळे नोवाक जोकोविच स्पर्धेबाहेर -
जागतिक क्रमवारीत नं.१ असणाऱ्या टेनिसपटू नोवाक जोकोविचला अमेरिकेतील यूएस ओपन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. उपउपांत्य फेरीच्या आधीच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे त्याला स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे. जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा स्टेन वाँवारिका यांच्यात सामना सुरु होता. या सामन्याच्या तिसऱ्या से़टमध्ये जोकोविचला खांद्य़ाची दुखापत झाली. त्यामुळे त्याने पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला. जोकोविच बाहेर पडल्यामुळे वाँवारिकाला पुढच्या सामन्यासाठी थेट प्रवेश मिळाला आहे.