महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

GREAT! सुपर मॉम यूएस ओपनच्या अंतिम फेरीत - us open final

या सामन्यामध्ये ३७ वर्षीय सेरेनाने स्विटोलिना हिला वरचढ होऊ दिले नाही. या सामन्यात सेरेनाच फेवरेट मानली जात होती. तिने स्विटोलिनावर सहज विजय नोंदवला. अंतिम फेरीत तिला १५ व्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या बियांका आंद्रेस्कू हिचे आव्हान असणार आहे.

GREAT! सेरेना विल्यम्स यूएस ओपनच्या अंतिम फेरीत

By

Published : Sep 6, 2019, 2:44 PM IST

नवी दिल्ली -टेनिसविश्वात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या सेरेना विल्यम्सने यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने उपांत्य सामन्यात ५ व्या मानांकित युक्रेनच्या एलिना स्विटोलिना हिला ६-३, ६-१ असे पराभूत केले.

हेही वाचा -स्टीव स्मिथचे २६ वे शतक; विराट कोहलीला टाकले मागे

या सामन्यामध्ये ३७ वर्षीय सेरेनाने स्विटोलिना हिला वरचढ होऊ दिले नाही. या सामन्यात सेरेनाच फेवरेट मानली जात होती. तिने स्विटोलिनावर सहज विजय नोंदवला. अंतिम फेरीत तिला १५ व्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या बियांका आंद्रेस्कू हिचे आव्हान असणार आहे. कॅनडाच्या १९ वर्षीय बियांकाने उपांत्य फेरीत १३ वी मानांकित बेलिंडा बेंकिक हिला ७-६ (७-३), ७-५ असे पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा -विराटच्या 'त्या' फोटोवर लोक म्हणाले, बायकोने घराबाहेर काढल्याने झाली का ही अवस्था?

बियांकाने पहिल्यांदाच या स्पर्धेत प्रवेश घेतला आहे आणि एका ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर, यूएस ओपनमध्ये सेरेनाने १०व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सेरेनाने सहा वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यासोबतच तिने यूएस ओपनच्या क्रिस एवर्टच्या सर्वाधिक विजयाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details