मेलबर्न -अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश नोंदवला आहे. बुधवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात सेरेनाने ६-३, ६-० असा सहज विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेनाचा तिसऱ्या फेरीत प्रवेश - सेरेना विल्यम्स लेटेस्ट न्यूज
सेरनाने दुसऱ्या फेरीत सर्बियाच्या नीना स्टोजानोव्हिकवर मात केली. ३९ वर्षीय सेरेनाने नीनाविरुद्ध आक्रमक खेळाचे दर्शन घडवले. सामन्याच्या सुरुवातीपासून तिने नीनाला दबावात ठेवले.
सेरनाने दुसऱ्या फेरीत सर्बियाच्या नीना स्टोजानोव्हिकवर मात केली. ३९ वर्षीय सेरेनाने नीनाविरुद्ध आक्रमक खेळाचे दर्शन घडवले. सामन्याच्या सुरुवातीपासून तिने नीनाला दबावात ठेवले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत सेरेनाने जर्मनीच्या लॉरा सिग्मंडला ६-१, ६-१ असे पराभूत केले. या स्पर्धेच्या इतिहासातील हा तिचा १००वा सामना होता.
बार्टी दुसऱ्या फेरीत
जवळपास एका वर्षानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुनरागमन करणारी महिला टेनिसपटू अॅश्ले बार्टी हिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या बार्टीने पहिल्या फेरीत डंका कोविनिच हिचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवला.