नवी दिल्ली - भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झा सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनमच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कारण, तिचे लग्न भारताच्या महान माजी क्रिकेटपटूच्या मुलाशी होऊ शकते.
हेही वाचा -विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : विनेश फोगटचा विजयारंभ, सलामीलाच ऑलिम्पिक विजेतीवर केली मात
माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा मोहम्मद असादुद्दीन याच्याशी अनम मिर्झाचे लग्न होऊ शकते. अनमने असादुद्दीनसोबत अनेक वेळा फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर ते दोघे एकमेकांसोबत डेट करत असल्याने चर्चेत आले होते.