महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

होबार्ट इंटरनॅशनल टुर्नामेंट : दोन वर्षानंतर सानियाने केलं दमदार 'कमबॅक' - सानिया मिर्झा लेटेस्ट न्यूज

दोन वर्षानंतर सानिया टेनिस कोर्टवर परतली आहे. २०१७ मध्ये पार पडलेल्या चीन ओपन स्पर्धेत सानिया मैदानात उतरली होती.

Sania Mirza returns to WTA circuit with a win
होबार्ट इंटरनॅशनल टुर्नामेंट : दोन वर्षानंतर सानियाने केलं दमदार 'कमबॅक'

By

Published : Jan 14, 2020, 4:04 PM IST

होबार्ट -भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने होबार्ट इंटरनॅशनल टुर्नामेंट स्पर्धेत विजय मिळवत दमदार पुनरागमन केले. सानिया आणि युक्रेनच्या नादिया किचनोक या जोडीने महिला दुहेरीत कसाना के आणि मियू काटोचा २-६, ७-६, १०-३ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश नोंदवला.

हेही वाचा -IND VS AUS : भारताचे शतक पूर्ण, शिखर-राहुलची जोडी मैदानात

दोन वर्षानंतर सानिया टेनिस कोर्टवर परतली आहे. २०१७ मध्ये पार पडलेल्या चीन ओपन स्पर्धेत सानिया मैदानात उतरली होती. 'आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक होता' असे सानियाने सामना झाल्यानंतर, ट्विटमध्ये म्हटले आहे.

नवीन वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सानिया रोहन बोपण्णा सोबत मैदानावर उतरू शकते. राजीव रामने या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सानियाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details