नवी दिल्ली - भारताची आघाडीची महिला टेनिसस्टार सानिया मिर्झा कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उभी ठाकली असून तिने लोकांच्या मदतीसाठी १.२५ कोटी उभे केले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण जग एकटवले असून अनेक जण विविध अंगाने आपली मदत पोहोचवत आहेत.
कोरोनाविरूद्ध लढाईसाठी सानियाने दिले सव्वा कोटी - सानिया मिर्झा कोरोना देणगी न्यूज
गेल्या आठवड्यात आम्ही एक संघ म्हणून गरजू लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न केला आहे. आम्ही हजारो कुटुंबांना अन्न पुरवले आणि एका आठवड्यात १.२५ कोटी वाढवले ज्यामुळे जवळपास १ लाख लोकांना मदत होईल, असे सानियाने ट्विटरवर म्हटले आहे.
कोरोनाविरूद्ध लढाईसाठी सानियाने दिले सव्वा कोटी
गेल्या आठवड्यात आम्ही एक संघ म्हणून गरजू लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न केला आहे. आम्ही हजारो कुटुंबांना अन्न पुरवले आणि एका आठवड्यात १.२५ कोटी वाढवले ज्यामुळे जवळपास १ लाख लोकांना मदत होईल, असे सानियाने ट्विटरवर म्हटले आहे.
कोरोना विरुद्ध मदत करण्यासाठी अनेक खेळाडू पुढे येऊन आपले योगदान देत आहेत. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्कालीन परिस्थितीत पंतप्रधान सहायता निधी तयार केला असून देशवासीयांनी पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन केले.