महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सानिया मिर्झा मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा मैदानात उतरणार - sania mirza

मुलगा इजहान यांच्या जन्मानंतर सानियाने दररोज चार तास सराव करत तब्बल 26 किलो वजन कमी केले आहे. सानियाला 2017 मध्ये गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिने टेनिस खेळणे बंद केले होते. आता वजन कमी करुन ती पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे.

सानिया मिर्झा मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा मैदानात उतरणार

By

Published : Aug 1, 2019, 4:27 PM IST

नवी दिल्ली- भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा पुन्हा टेनिसच्या मैदानात उतरणार आहे. आई झाल्यानंतर सानिया मागील काही काळापासून टेनिसपासून लांब होती. मात्र तिने आता पुन्हा कोर्टवर उतरण्याचा निर्धार केला असून ती टोकियो ऑलंम्पिकमध्ये भाग घेणार असल्याचे सांगितले.

याविषयी बोलताना सानिया म्हणाली, मी यावर्षी ऑगस्ट महिन्यात कोर्टवर उतरण्याचा निर्धार केला होता. मात्र, फिटनेस अभावी मी जानेवारी 2020 मध्ये मैदानात उतरणार आहे. करिअरमध्ये मी खूप काही मिळवले आहे. यामुळे फक्त खेळाचा आनंद घेण्यासाठी मी पुन्हा मैदानात उतरत आहे. असे तिने सांगितलं.

मुलगा इजहान यांच्या जन्मानंतर सानियाने दररोज चार तास सराव करत तब्बल 26 किलो वजन कमी केले आहे. सानियाला 2017 मध्ये गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिने टेनिस खेळणे बंद केले होते. आता वजन कमी करुन ती पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे.

सानिया मिर्झाने आपल्या करिअरमध्ये सहा ग्रँमस्लॅम जिंकले आहेत. या शिवाय तिने मार्टिना हिंगीस हिच्यासोबत खेळत डब्ल्यूटीएची स्पर्धाही जिंकली आहे. सगळे काही ठिक असल्यास मी टोकियो ऑलंम्पिकमध्ये भाग घेईन. असे सानिया म्हणाली.

ABOUT THE AUTHOR

...view details