होबार्ट - भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने डब्ल्यूटीए सर्किटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. सानियाने युक्रेनच्या नादिया किचेनोकसमवेत होबर्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
हेही वाचा -INDvsAUS : नाणेफेक जिंकून कांगारूंचा गोलंदाजीचा निर्णय
दोन वर्षानंतर टेनिसकोर्टवर पाय ठेवलेल्या सानियाने किचेनोकसमवेत उपांत्य फेरीत चेक प्रजासत्ताकची मेरी बाउज्कोवा आणि स्लोवेनियाची तमारा जिदानसेक या जोडीला ७-६ (३), ६-२ असे हरवले. हा सामना दीड तास रंगला होता. सानिया आणि किचेनोकने या सामन्यात १५ ब्रेक पॉईंट मिळवले. शनिवारी या जोडीचा अंतिम सामना चीनच्या झांग शुई आणि पेंग शुईशी होईल.
नवीन वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सानिया रोहन बोपण्णा सोबत मैदानावर उतरू शकते. राजीव रामने या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सानियाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.