नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे सर्वजण घरात अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकजणांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. भारत आणि पाकिस्तान या देशांमध्येही लॉकडाऊन सुरू आहे. या कठीण काळात भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने आपल्या मुलाबाबतची चिंता व्यक्त केली आहे. मुलगा पुन्हा आपल्या वडिलांना कधी भेटू शकेल, हे माहित नसल्याचे सानिया म्हणाली.
“मुलाला वडिलांना परत कधी पाहता येईल?”, सानियाने व्यक्त केली चिंता - sania mirza and shoaib malik news
सानिया म्हणाली, “जेव्हा कोरोना विषाणूचा प्रारंभ झाला, तेव्हा मी इंडियन वेल्स टूर्नामेंटसाठी अमेरिकेत होती. ती रद्द झाली आणि मी भारतात परतले. त्याच वेळी शोएब पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) खेळत होता. त्यानंतर तो त्याच्या आईसह सियालकोट येथे राहिला. आणि मी येथे मुलासह भारतात राहिली. त्याची आई ६५ वर्षांची आहे, त्यामुळे तिला शोएबची जास्त गरज होती. पण मुलाला त्याच्या वडिलांना कधी पाहता येईल हे माहित नाही.”

महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा सोमवारी फेड कप हार्ट पुरस्कार जिंकणारी भारताची पहिली खेळाडू ठरली. सानियाला इंडोनेशियाच्या प्रिस्का मेडेलिन न्यूग्रोहोसह एशिया / ओशिनिया विभागातून नामांकन देण्यात आले. सानियाला पुरस्कारासोबत 2,000 डॉलर्स देखील मिळाले आहेत. हा निधी चॅरिटीमध्ये जाणार आहे. सानियाने ही रक्कम कोरोना निधीमध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. "कोरोना व्हायरसच्या या कठीण परिस्थितीत मला मिळालेली बक्षीस रक्कम तेलंगाणाच्या मुख्यमंत्री मदत निधीला देत आहे", असे सानियाने सांगितले.