महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरोना संकट : भारतापाठोपाठ सानियाने पाकिस्तानलाही केली मदत - कोरोना संकटात सानियाची मदत

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, सानिया समवेत टेनिस विश्वातील दिग्गज राफेल नदाल, रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच आणि मारिया शारापोव्हा हेही पाकिस्तानला मदत करणार आहे. हे सर्वजण Stars Against Hunger या चळवळीशी जोडले गेले आहे. यात त्यांनी त्यांची स्वाक्षरी असलेल्या काही वस्तू लिलाव करण्यासाठी दिल्या आहेत.

Sania Mirza Donates Signed Memorabilia For Special COVID-19 Relief Auction In Pakistan
कोरोना संकट : भारतापाठोपाठ सानियाने पाकिस्तानलाही केली मदत

By

Published : May 20, 2020, 5:30 PM IST

मुंबई- भारताची स्टार टेनिसपटू आणि पाकिस्तानची सून सानिया मिर्झाने, पाकिस्तानातील गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे पाकिस्तानामधील रोजंदारी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांच्या मदतीसाठी सानिया धावली आहे.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, सानिया समवेत टेनिस विश्वातील दिग्गज राफेल नदाल, रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच आणि मारिया शारापोव्हा हेही पाकिस्तानला मदत करणार आहे. हे सर्वजण Stars Against Hunger या चळवळीशी जोडले गेले आहे. यात त्यांनी त्यांची स्वाक्षरी असलेल्या काही वस्तू लिलाव करण्यासाठी दिल्या आहेत.

पाकिस्तानचा टेनिसपटू एैसाम-उल-हक कुरेशी याने Stars Against Hunger ही चळवळ सुरू केली असून याच्या माध्यमातून उभा राहणाऱ्या निधीतून पाकिस्तानमधील गरीब कुटुंबांना रेशन पुरवण्यात येणार आहे. या मोहिमेत शोएब मलिक, वसीम अक्रम यांनीही हातभार लावला आहे.

दरम्यान, सानियाने याआधी भारतासाठी मदत उभारली आहे. तिने एक चळवळ उभी करून त्यातून तिने एका आठवड्यात 1.25 कोटी रुपयांचा निधी गोळा केला. या निधीतून तिने जवळपास 1 लाख लोकांना मदत देऊ केली आहे. सानियाला काही दिवसांपूर्वी फेड कप हार्ट पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.

हेही वाचा -कसोटी सामन्यात स्थानिक पंचांना संधी द्या... भारतीय पंचासाठी ठरणार आव्हानात्मक

हेही वाचा -पत्नीसाठी काय पण..! विराट अनुष्कासाठी बनला डायनॉसोर, पाहा मजेशीर व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details