दुबई -भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिची फ्रेंच साथीदार कॅरोलिन गार्सिया यांनी मंगळवारी दुबई ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला दुहेरीत खेळताना त्यांनी रशियाच्या अल्ला कुद्र्यावत्सेवा आणि स्लोव्हेनियाच्या कतरिना सर्बोट्निक यांच्यावर ६-४, ४-६, १०-८ असा विजय नोंदवला.
दुबई ओपन : सानिया मिर्झा-कॅरोलिन गार्सिया उपांत्यपूर्व फेरीत - sania and garcia dubai open news
३३ वर्षीय सानिया दुखापतीतून सावरल्यानंतर दुबई ओपनमध्ये परतली आहे. सानिया-गार्सिया यांनी शियाच्या अल्ला कुद्र्यावत्सेवा आणि स्लोव्हेनियाच्या कतरिना सर्बोट्निक यांच्यावर मात केली.
हेही वाचा -VIDEO : विराटने दिले निवृत्तीचे संकेत, वाचा काय म्हणाला कोहली
सानिया-गार्सिया यांचा पुढील सामना चीनच्या सिसई जियांग आणि झेक प्रजासत्ताकाच्या बार्बोरा क्रेयस्कोवा यांच्याशी होईल. ३३ वर्षीय सानिया दुखापतीतून सावरल्यानंतर दुबई ओपनमध्ये परतली आहे. तत्पूर्वी, तब्बल आठ वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या बेल्जियमच्या किम क्लाइस्टर्सला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच स्पेनच्या गार्बिन मुगुरूझाने बेल्जियमच्या किमला ६-२, ७-६ असे नमवले.