महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Wimbledon : सानिया मिर्झाची विजयी सलामी; महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश - सानिया-बेथनी जोडी विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने अमेरिकेच्या बेथनी मॅटेक-सँड्ससोबत खेळताना विम्बल्डन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

Sania Mirza And Bethanie Mattek-Sands Stun Sixth Seeds To Enter Wimbledon 2nd Round
Wimbledon : सानिया मिर्झाची विजयी सलामी; महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश

By

Published : Jul 1, 2021, 10:54 PM IST

लंडन - भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने अमेरिकेच्या बेथनी मॅटेक-सँड्ससोबत खेळताना विम्बल्डन स्पर्धेत विजयी सलामी दिली. सानिया-बेथनी जोडीने महिला दुहेरीत देसीरे क्रावझिक आणि अलेक्सा गुराची या सहाव्या मानांकित जोडीचा ७-५, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली.

पहिल्या सेटमध्ये सानिया-बेथनीवर प्रतिस्पर्धी जोडीने दबाव टाकला. परंतु, या दोघींनी अडखळत्या सुरुवातीनंतर चांगले पुनरागमन करत हा सेट ७-५ असा फरकाने जिंकला. हाच धडाका कायम राखत दोघांनी दुसरा सेट दुसरा सेट ६-३ असा मोठ्या फरकाने जिंकला. हा सामना एक तास आणि २७ मिनिटे रंगला होता.

मेदवेदेवची घौडदौड, स्वितोलिनाचे आव्हान संपुष्टात

रशियाचा स्टार टेनिसपटू डॉनिल मेदवेदेवने विम्बल्डन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. त्याने कार्लोस गार्फिया याचा ६-४, ६-१, ६-२ अशा एकतर्फा पराभव केला. दुसरीकडे महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली एलिना स्वितोलिनाला पराभवाचा धक्का बसला.

हेही वाचा -विम्बल्डनमध्ये एका महिलेवर फोकस झाला कॅमेरा, प्रेक्षकांनी उभे राहून केला टाळ्याचा कडकडाट

हेही वाचा -Wimbledon open : मेदवेदेव तिसऱ्या फेरीत, एलिना स्वितोलिनाचे आव्हान संपुष्टात

ABOUT THE AUTHOR

...view details