मेलबर्न -रोमानियन टेनिसपटू सिमोना हॅलेपने बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. रॉड लेव्हर अरेना येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चौथ्या मानांकित हॅलेपने २८ व्या मानांकित एस्टोनियाच्या अॅनेट कॉन्टावेटचा ६-१, ६-१ असा पराभव केला. हा सामना ५३ मिनिटे चालला. हॅलेप दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहोचली आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन : रोमानियन टेनिसपटू सिमोना हॅलेप उपांत्य फेरीत
चौथ्या मानांकित हॅलेपने २८ व्या मानांकित एस्टोनियाच्या अॅनेट कॉन्टावेटचा ६-१, ६-१ असा पराभव केला. हॅलेप दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहोचली आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन : रोमानियन टेनिसपटू सिमोना हॅलेप उपांत्य फेरीत
हेही वाचा -एक सामना...४८ षटकार...७० चौकार...८१८ धावा!
दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत ३२ व्या क्रमांकावर असलेल्या गार्बिन मुगुरुझाने प्रथमच स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. तिने रशियाच्या अनास्तासिया पावलियुचेंकोवाचा ७-५, ६-३ असा पराभव केला. हा सामना १ तास ३३ मिनिटे चालला.