रॉटरडॅम -भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनेडियन जोडीदार डेनिस शापोवालोव यांनी रॉटरडॅम ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या जॉन पियर्स आणि मिचेल व्हीनसचा पराभव करून अंतिम-८ मध्ये प्रवेश नोंदवला.
रॉटरडॅम ओपन : पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा उपांत्यपूर्व फेरीत - रोहन बोपण्णा डेनिस शापोवालोव न्यूज
बोपण्णा -शापोवालोव जोडीने ऑस्ट्रेलियाच्या जॉन पियर्स आणि मिचेल व्हीनसवर मात केली.
रॉटरडॅम ओपन : पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा उपांत्यपूर्व फेरीत
हेही वाचा -नेपाळचे वर्ल्ड रेकॉर्ड, विरोधी संघाला ३५ धावांत गुंडाळले
बोपण्णा -शापोवालोव जोडीने ऑस्ट्रेलियन जोडीवर ७-६, ६-७, १०-८ अशी मात केली. चौथ्या मानांकित बोपण्णा -शापोवालोव जोडीचा पुढील सामना गुरुवारी चौथ्या मानांकित जीन-ज्युलियन रॉजर आणि होरिया टेकाऊशी सामना होईल.