न्यूयॉर्क - भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा सहकारी डेनिस शापोव्हालोव्ह यांना यूएस ओपनच्या पुरूष दुहेरीमध्ये आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यांच्या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचेही आव्हान संपुष्टात आले. नेदरलँड्सचा जीन-ज्युलियन रोजर आणि रोमानियाचा होरिया टेकू या जोडीने त्यांना ७-५, ७-५ असे हरवले.
यूएस ओपन २०२० : भारताचे आव्हान संपुष्टात - यूएस ओपन लेटेस्ट न्यूज
रोजर आणि टेकू यांनी पहिल्या सेटमध्ये आक्रमकता दाखवत दमदार सुरूवात केली. दुसऱ्या सेटमध्ये बोपण्णा आणि त्याचा सहकारी शापोव्हालोव्हकडून प्रतिकाराची अपेक्षा होती. मात्र रोजर आणि टेकू त्यांच्यावर वरचढ ठरले.

हा सामना ९० मिनिटे रंगला होता. विजेत्या जोडीला पुढच्या फेरीत मॅट पेविक आणि ब्रुनो सोरेस या जोडीशी दोन हात करावे लागणार आहे. दिविज शरण आणि सुमित नागलनंतर बोपण्णा हा या स्पर्धेत एकमेव भारतीय खेळाडू होता. स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या दुसर्या फेरीत नागलचा पराभव झाला, तर शरण आणि सर्बियाच्या निकोला कॅसिकला पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला.