नवी दिल्ली - स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर याने विजयी परंपरा कायम राखत अजून एका स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. ३७ वर्षीय फेडररने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बेल्जियमच्या डेविड गोफिनचा पराभव करत आपल्या कारकिर्दीतील १० वी हाले एटीपी स्पर्धा जिंकली आहे.
अनस्टॉपेबल रॉजर फेडरर, १० वी हाले ओपन टेनिस स्पर्धाही जिंकली - david goffin
उपांत्य फेरीत फेडररने ह्यूजेस हर्बर्टला ६-१ ६-३ असे पछाडले होते.

फेडरर
एकूण १३ वेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या फेडररने गोफिनचा ७-६, ६-१ असा पराभव केला. त्याने आपल्या कारकिर्दीतील १०२ वे एकेरी विजेतेपद पटकावले आहे. उपांत्य फेरीत फेडररने ह्यूजेस हर्बर्टला ६-१ ६-३ असे पछाडले होते.
या विजेतेपदानंतर फेडररने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'हे अविश्वसनीय आहे. जेव्हा मी पहिल्यांदा ही स्पर्धा खेळलो होतो तेव्हा, मला वाटले नव्हते की मी १० विजेतेपद पटकावू शकतो.'