मियामी -स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने मियामी ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. चौथ्या फेरीत तीन वेळा मियामी ओपनचा विजेता असेलेल्या फेडररने १५ व्या मानांकित डेनिल मेदवेदेवचा ६-४, ६-२ ने पराभव केला.
क्वार्टर फायनलमध्ये फेडररचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या केवीन अँडरसनशी होणार आहे. २० ग्रँडस्लॅम विजेता असेलेल्या फेडररने १ तास आणि १ मिनीट चाललेल्या या सामन्यात डॅनियलवर सरळ सेटमध्ये विजय मिळवला. फेडररने २०१७ मध्ये अखेरच्या वेळी मियामी ओपनचा किताब जिंकला होता.
या स्पर्धेत टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला नोव्हाक जोकोविचला काल पराभवाचा धक्का बसला होता. स्पेनच्या रॉबेर्टो अगुटने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या जोकोविचवर मात करत धक्कादायक निकाल नोंदवला होता.