मेलबर्न -टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू रॉजर फेडररने पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. फेडररच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे.
टोनी गॉडसिक यांनी सांगितले की, 'फेडररने २०२१ ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला मागील काही महिन्यापासून गुडघ्याचा त्रास होत आहे. यातून सावरण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर जोमात पुनरागमन करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. एटीपी टूर स्पर्धेतून तो वापसी करण्याची योजना आखत आहे.'
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा यंदा तीन आठवडे उशिरा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेला पुढील वर्षी ८ फेब्रुवारीपासून मेलबर्न पार्कमध्ये सुरूवात होणार आहे. फेडरर सद्या दुबईमध्ये फिटनेसकडे लक्ष देत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया ओपन २०२० नंतर एकही स्पर्धा खेळलेली नाही.