महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फेडररने चाहत्यांच्या विनंतीवर बदलला प्रोफाइल फोटो; तुम्हीही म्हणाल क्या बात! - टेनिश विषयी बातम्या

चाहत्यांनी सांगितलेला फोटो फेडररने आपल्या ट्विटर अकाउंटवर डीपी म्हणून ठेवला आहे. तो फोटो फेडररच्या लहानपणाचा असून यात तो स्माईल करताना दिसत आहे. फेडररने या फोटोसोबत 'न्यू प्रोफाइल पिक' असाही उल्लेख केला आहे. दरम्यान, फेडररच्या त्या आवाहनानंतर जगभरातील लाखो चाहत्यांनी आपल्या आवडीचे फोटोबद्दल मत व्यक्त केले होते. मात्र, फेडररने एका चाहत्याच्या आवडीचा फोटो 'फायनल' केला.

फेडररने चाहत्यांच्या विनंतीवर बदलला प्रोफाइल फोटो, फोटो पाहून तुम्हालाही येणार हसू

By

Published : Oct 8, 2019, 10:31 PM IST

Updated : Oct 8, 2019, 10:59 PM IST

बासेल- स्वित्झरलँडचा दिग्गज टेनिस खेळाडू रॉजर फेडररने चाहत्यांच्या विनंतीवर आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा प्रोफाईल फोटो बदलला. दरम्यान, फेडररनेच आपल्या चाहत्यांना ट्विटर अकाउंटसाठी कोणता प्रोफाईल फोटो फिट दिसेल ते निवडा, असे आवाहन केले होते.

चाहत्यांनी सांगितलेला फोटो फेडररने आपल्या ट्विटर अकाउंटवर डीपी म्हणून ठेवला आहे. तो फोटो फेडररच्या लहानपणाचा असून यात तो स्माईल करताना दिसत आहे. फेडररने या फोटोसोबत 'न्यू प्रोफाइल पिक' असाही उल्लेख केला आहे.

आपल्या बालपणाचा फोटो फेडररने डीपी म्हणून ठेवला आहे

दरम्यान, फेडररच्या त्या आवाहनानंतर जगभरातील लाखो चाहत्यांनी आपल्या आवडीचे फोटोबद्दल मत व्यक्त केले होते. मात्र, फेडररने एका चाहत्याच्या आवडीचा फोटो 'फायनल' केला.

काही दिवसांपूर्वीच फेडररने भारतीय चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार कोणता चित्रपट पाहावा, याबद्दल चाहत्यांकडून अभिप्राय मागविला होते. तेव्हा एका चाहत्याने त्याला 'शोले', 'लगान', 'दंगल 'आणि 'जोधा अकबर' हे चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. या चाहत्याचे चक्क त्याने आभारही मानले होते. तर, आपण आतापर्यंत ऑस्कर पुरस्कार विजेता 'स्लमडॉग मिलियनेयर' हा चित्रपटही पाहिला नसल्याचे त्याने कबुल केले आहे.

हेही वाचा -VIDEO: नोव्हान जोकोव्हीच २५० किलो सुमो पैलवानशी पंगा घेतो, तेव्हा..

हेही वाचा -युवीच्या 'चिकना चमेला' लूकवर सानिया मिर्झाचे मजेशीर कमेंट

Last Updated : Oct 8, 2019, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details