महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रॉजर फेडरर : इंग्लंड ग्रँडस्लॅम इतिहासात उपांत्यपूर्व फेरी गाठणारा वयस्कर खेळाडू - सानिया मिर्झा

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने १८व्यांदा विम्बल्डन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. फेडरर १९७७नंतर ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत गाठणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. फेडरर याने केन रोजवेल याचा (३९ वर्ष २२४ दिवस) रेकॉर्ड मोडला. फेडररने हा कारनामा ३९ वर्ष ३३७ वय असताना केला.

http://10.10.50.90//english/02-July-2021/federer_0207newsroom_1625197942_877.jpg
रॉजर फेडरर : इंग्लंड ग्रँडस्लॅम इतिहासात उपांत्यपूर्व फेरी गाठणार वयोवृद्ध खेळाडू

By

Published : Jul 6, 2021, 3:41 PM IST

लंडन - स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने १८व्यांदा विम्बल्डन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या लोरेन्झो सोनेगो याचा ७-५, ६-४, ६-२ ने पराभव केला.

रॉजर फेडरर १९७७नंतर ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत गाठणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. फेडरर याने केन रोजवेल याचा (३९ वर्ष २२४ दिवस) रेकॉर्ड मोडला. फेडररने हा कारनामा ३९ वर्ष ३३७ वय असताना केला. फेडररच्या नावे २० ग्रँडस्लॅमचे विजेतेपद आहेत. त्याने आतापर्यंत ८ वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे.

रॉजर फेडरर विरुद्ध लोरेन्झो सोनेगो यांच्यातील सामन्याचे हायलाइट्स

उपांत्यपूर्व फेरीत रॉजर फेडररचा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला रशियाच्या डॅनिल मेदवेदेव आणि जागतिक क्रमवारीत १४व्या क्रमांकावरील पोलंडच्या ह्युबर्ट हेरकाझ यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. दरम्यान, मेदवेदेव आणि हेरकाझ यांच्यातील सामना सोमवारी पावसामुळे स्थगित करण्यात आला होता. दुसरीकडे आंद्रेस रुब्लेव्ह, अमेरिकेची युवा महिला टेनिसपटू कोको गॉफ, बाबरेरा क्रेजिकोव्हा आणि इशा श्वीऑनटेक यांचे मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच आव्हान संपुष्टात आले.

जोकोव्हिचची उपांत्यपूर्व फेरीत धडक

जागतिक क्रमवारीतील अव्वल दर्जाचा खेळाडू नोवाक जोकोव्हिच याने विम्बल्डन २०२१ ची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याने चौथ्या फेरीत चिलीच्या ख्रिश्चियन गारिन याचा ६-२, ६-४, ६-२ अशा एकतर्फा पराभव केला. जोकोव्हिचने ख्रिश्चियनचा तीन सेटमध्ये सरळ पराभव केला.

सानिया-बोपण्णा जोडीचे आव्हान संपुष्टात

भारतीय मिश्र दुहेरी जोडी सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा याचे आव्हान संपुष्टात आले. ब्रिटनच्या एडन मॅकह्य़ूज आणि एमिली स्मिथ जोडीने सानिया-बोपण्णा जोडीचा ६-३, ६-१ असे सहज पराभूत केले. त्याशिवाय पत्नी समांथा मरेसह मिश्र दुहेरीत सहभागी झालेल्या दिविज शरणलासुद्धा पराभव पत्करावा लागला. राव्हेन क्लासेन आणि दारिजा जुरॅक या जोडीने दिविज-समांथा यांना ३-६, ७-६ (७-१), ६-३ असे नमवले.

हेही वाचा -नोवाक जोकोव्हिच Wimbledon २०२१ च्या उपांत्यपूर्व फेरीत

हेही वाचा -Big Braking! पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी इंग्लंड ताफ्यातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण

ABOUT THE AUTHOR

...view details