बासेल : सोशल मीडियामुळे खेळाडू आणि चाहते यांच्या नात्यात एक दृढता निर्माण झाली आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रत्यक्ष भेटता येत नसले तरी या चाहत्यांना फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून आपल्या आवडत्या खेळाडूशी संवाद साधता येतो. टेनिसचा महानायक रॉजर फेडरर आणि त्याच्या चाहत्यांबाबत नुकताच असाच एक किस्सा घडला.
हेही वाचा -बास्केटबॉल : दुसऱ्या सामन्यातही इंडियाना पेसर्सची सॅक्रेमेंटो किंग्सवर मात
फेडररने आपला प्रोफाईल फोटो बदलण्यासाठी चाहत्यांचा सल्ला घेतला. फेडररने विचारलेल्या या प्रश्नाला चाहत्यांनी मनमुरादपणे दाद दिली. चाहत्यांनी पाठवलेल्या या फोटोंनाही 'अजून फोटो पाठवत राहा. उद्या रात्री जेवण करताना मी हे फोटो बघेन', असे फेडररने उत्तर दिले.
चाहत्यांनी पाठवलेले फोटो -
त्यापैकी, एका चाहत्याने फेडररला आपला प्रोफाईल फोटो बदलण्याचा सल्ला दिला. तेव्हा फेडररने त्या चाहत्याला आश्वासक उत्तर दिले. नुकत्याच एका कंपनीने फेडररसोबत मुलाखत घेतली होती. तेव्हा त्याने भारताबद्दल आणि तिथल्या चाहत्यांबद्दल मत मांडले होते. 'मला भारत देश खुप आवडतो. मी तिथे प्रवास करण्यासाठी उत्सुक आहे. हा देश खुप उत्साहाने भरलेल्या लोकांचा आहे', असे फेडरर म्हणाला होता. फेडररने २००६, २०१४ आणि २०१५ मध्ये भारताचा दौरा केला होता.