महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फ्रेंच ओपन : रॉजर फेडररचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, अँजेलिक कर्बरला पराभवाचा धक्का - advances

महिला एकेरीत एंजलिक कर्बरला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का

रॉजर फेडरर

By

Published : May 27, 2019, 11:34 AM IST

पॅरिस - स्वीत्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडररने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत फेडररने ४१ मिनिटे चाललेल्या सामन्यात इटलीच्या लोरेंजो सोनेगोचा ६-२, ६-४, ६-४ ने पराभव केला.

४ वर्षांनंतर प्रथमच फ्रेंच ओपनमध्ये खेळणाऱ्या फेडररचा दुसऱ्या फेरीतील सामना हा जर्मनीच्या ऑस्कर ओट्टशी होणार आहे. २० ग्रँडस्लॅम विजेता असेलेल्या रॉजर फेडरर आजवर फ्रेंच ओपनचा किताब एकदाच आपल्या नावावर करता आला आहे. ३७ वर्षीय फेडररने २००९ मध्ये फ्रेंच ओपन आपल्या नावावर केली होती.

दुसरीकडे महिला एकेरीत एंजलिक कर्बरला पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. कर्बरला रशियाच्या १८ वर्षीय अनास्तासिया पोटापोव्हाने ६-४, ६-२ मे पराभूत करत टेनिसविश्वात खळबळ उडवून दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details