पॅरिस - स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये विजयारंभ केला आहे. पहिल्या फेरीत नदालने सोमवारी बेलारूसच्या इगोर गेरासीमोव्हला ६-४, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत दुसरी फेरी गाठली. दुसर्या फेरीत नदालचा सामना मॅकेन्झी मॅक्डोनाल्डशी होईल.
फ्रेंच ओपन : राफेल नदालची दुसऱ्या फेरीत धडक - rafael nadal and roland garro
स्पेनच्या नदालने फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत बेलारूसच्या इगोर गेरासीमोव्हला ६-४, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. याशिवाय अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्सने फ्रेंच ओपनमध्ये आपली विजयी सुरुवात केली आहे.
![फ्रेंच ओपन : राफेल नदालची दुसऱ्या फेरीत धडक rafael nadal wins roland garros openers 2020](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8981832-thumbnail-3x2-ffff.jpg)
ही रोलँड गॅरोस स्पर्धा वेगळी आहे. आम्ही ज्या स्पर्धेत खेळत होतो ते वेगळेच होते. पण माझ्यासाठी हे वर्ष तितकेच खास आहे, जे इतर लोकांसाठी आहे. मी माझ्याकडून सर्व प्रयत्न करेन. चांगली सुरुवात झाल्यानंतर दुसर्या फेरीत प्रवेश केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता हॉटेलमध्ये जाण्याची, उद्या चांगला सराव करण्याची आणि दुसऱ्या फेरीसाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे."
याशिवाय अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्सने फ्रेंच ओपनमध्ये आपली विजयी सुरुवात केली आहे. तीन वेळा फ्रेंच ओपन जिंकणार्या सेरेनाने सोमवारी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत क्रिस्टी एहनचा ७-६, ६-० असा पराभव करून तिच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला. सेरेनाने ७४ मिनिटांत हा सामना जिंकला.