मेलबर्न -स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने शनिवारी येथील रॉड लेव्हर अरेना येथे पाब्लो कॅरेनो बुस्तावर विजय मिळवत ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.
हेही वाचा -न्यूझीलंडला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाने रचला खास विक्रम!

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नदालने आपल्या देशाच्या पाब्लोवर तीन तास सरळ सेटमध्ये ६-१, ६-२, ६-४ अशी मात केली. नदालने हा सामना एक तास ३८ मिनिटांत खिशात टाकला. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचल्यास नदाल जागतिक क्रमवारीत अव्वल राहणार आहे.
नदालने दुसर्या फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या फेडरिको देल्बोनिसला हरवले होते. नदालने देल्बोनिसवरही ६-३, ७-६, ६-१ अशी सरळ सेटमध्ये मात केली. त्याने या सामन्यात तब्बल २० वेळा देल्बोनिसची सर्व्हिस मोडण्याची संधी निर्माण केली होती.